आमच्याबद्दल कोकण युवा सेवा संस्था नोंदणी क्रमांक : महा - १४४/२०२२ पालघर | एफ. १११२१ (पालघर) ध्यास समृद्ध कोकणचा २०२२ ते आजपर्यंत ध्येय धोरणे संस्थेमार्फत रक्तदान शिबीर राबवणे.प्रत्येक व्यक्तीचा सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक त्यासाठी सामाजिक शैक्षणिक व क्रीडा शिबीरे राबवणे.महिला वर्गासाठी आत्मरक्षण (सेल्फ डिफेन्स) शिबीरे तसेच स्वयंरोजगार क्लासेस उपलब्ध करून देणे व व्यवसाय व्यवस्थापन करून देणे.कोकणी तसेच महाराष्ट्रतील गरजू मुलांमुलीसाठी राहण्याची जेवणाची व रोजगार उपलब्ध करून देणे.गडकिल्ले साफसफाई व संवर्धन मोहीम राबवणे.कोकणी बांधवाना एकत्र आणण्यासाठी कोकण महोत्सव तसेच कोकणी मेळाव्याचे आयोजन करणे.कोकणातीत क्रिकेटपटू कोकण प्रीमिअर लीग चे आयोजन करणे तसेच अन्य क्रीडा टॉर्नामेंट चे आयोजन करणे.संस्थे अंतर्गत पतसंस्था स्थापन करणे.कोकणी बांधवानी परप्रांतीयांना जागाजमीन विकू नये यासाठी जनजागृती करणे.संस्थेच्या माध्यमातून उद्योजक लॉबी उभारणे.आपल्याच राज्यात (महाराष्ट्रातच)पाहुणे बनून राहू नका यासाठी मराठी बोला चळवळ सुरु करणे.कोकण पर्यटनाला चालना मिळावी यासाठी प्रयत्न करणे.संस्थेअंतर्गत अनाथाश्रम व वृद्धाश्रम बांधणे.संस्थेच्या अधिकृत सभासदाला मुलगी झाल्यास सदर सभासदाला संस्थेकडून २०००/- इतकी रक्कम देण्यात येईल.संस्थेअंतर्गत कोकण डेअरी व प्रक्रिया उद्योग सुरु करणे.स्त्रीभ्रूण हत्या थांबावी यासाठी जनजागृती करणे.कोकणात विविध प्रकारच्या वृक्षाची लागवड व संगोपन करणे.कृषी पर्यटन क्षेत्रात कोकणाला वेगळी ओळख करून देणे.सदर संस्थेच्या सभासदावर कोणताही आकस्मित प्रसंग ओढवला तर संस्था शक्य असेल त्या मर्यादेपर्यंत मदत करण्यास बांधील आहे. पदाधिकारी अभिजीत कोटकर संस्थापक/अध्यक्ष तृशांत पवार उपाध्यक्ष महेंद्र घडशी सहसचिव रुपेश कोलते कोकण युवा उद्योजक लॉबी प्रमुख नितेश पाटील संघटक प्रमुख संजना बेंद्रे खजिनदार अनिल गावडे सचिव